नवी दिल्लीः विवोचा सब ब्रँड iQOO याच महिन्यात भारतात आणि चीन मध्ये ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनीने हे कन्फर्म केले आहे की, चीनमध्ये फोन २३ सप्टेंबर रोजी आणणार आहे. तर भारतात हा फोन सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत येईल. आता एका ताज्या रिपोर्टनुसार, या फोनची किंमत आणि संभावित किंमत तसेच स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. iQOO Z5 ची किंमत GSMArena च्या माहितीनुसार, भारतात iQOO Z5 ची किंमत ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हँडसेट iQOO Z3 चा सक्सेसर असेल. ज्याला चीनमध्ये मार्च मध्ये जागतिक स्तरांवर जून मध्ये आणले गेले होते. या रिपोर्टमधून स्पष्ट झाले की, फोन भारतात सप्टेंबरच्या अखेर पर्यंत लाँच होईल. या फोनला २३ सप्टेंबर रोजी चीनमध्ये लाँच करण्यात येईल. iQOO Z5 चे संभावित स्पेसिफिकेशंस iQOO Z5 मध्ये क्वॉलकॉमचे लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ७७८ SoC चा समावेश करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जे 5G मॉडेम सोबत येते. फोन वेगाने एलपीडीडीआर ५ रॅम आणि यूएफएस ३.१ स्टोरेज देणार आहे. स्मार्टफोनमध्ये LCD डिस्प्ले शिवाय, 120Hz रिफ्रेशचा AMOLED पॅनेल असू शकतो. iQOO Z5 चे प्रो व्हेरियंट नुकतेच Google Play कन्सोल वर मॉडल नंबर V2148A सोबत दिसले आहे. प्ले कन्सोल लिस्टिंगने सांगितले की, फोनमध्ये फुल-एचडी+ (1,080x2,400 पिक्सल) डिस्प्ले असू शकतो. हा अँड्रॉयड ११ वर चालतो. IQoo Z5 Pro मध्ये ड्युअल स्टिरियो स्पीकर, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 44W फास्ट चार्जिंग सोबत 5,000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, iQoo Z5 Pro मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AzV2Al
via IFTTT