नवी दिल्ली : आणि ट्रू वायरलेस स्टीरियो (TWS) इयरफोन अमेरिकन बाजारात लाँच झाले आहे. यांची क्रमशः किंमत २०० डॉलर्स (जवळपास १४,७०० रुपये) आणि १३० डॉलर्स (जवळपास ९,६०० रुपये) आहे. हे कंपनीचे पहिले TWS आहे, जे अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन (एएनसी) फीचरसह येतात. इयरबड्स कानात एकदम फीट बसतात. वाचा: स्वस्त मध्ये क्लासिक आउटर-एअर फीट आणि १२ एमएम डायनॅमिक ड्रायव्हर दिले आहे. दोन्ही इयरफोन सध्या केवळ कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टेड असून, प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. ३० सप्टेंबरपासून याचा सेल सुरू होईल. अ‍ॅपलच्या एअरपॉड्सला देणार टक्कर भारतातील उपलब्धता आणि किंमतीबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. Marshall Motif ANC आणि Marshall Minor III दोन्हींमध्ये इयरपीससोबत चार्जिंग केससाठी यूनिक स्टाइल आणि टेक्स्चर आहे. नवीन हेडसेट अ‍ॅपलला जोरदार टक्कर देतील. मोटिफ एएनसीची थेट एअरपॉड्स प्रो शी स्पर्धा असेल. तर मायनर III हे एअरपॉड्स (सेकंड जनरेशन) ला टक्कर देतील. मार्शल गिटार एम्पलीफायर बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, कंपनी वायरलेस हेडफोन, इयरफोन आणि पोर्टेबल मल्टीमीडिया स्पीकरची देखील निर्मिती करते. Marshall Motif ANC, Marshall Minor III: फीचर्स Marshall Motif ANC हे कंपनीचे पहिले इयरबड्स आहे, जे एएनसी फीचरसह येते. इयरबड्स ६ एमएम डायनॅमिक ड्रायव्हरसह येतात, जे पॉवरफुल साउंड प्रदान करतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ वी५.२ दिले असून प्रत्येक इयरपीसमध्ये तीन मायक्रोफोन आहेत, जे एएनसीसह वॉइस कॉल करण्यास सक्षम आहेत. वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स५ आणि चार्जिंग केस वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपीएक्स३ रेटेड आहे. सिंगल चार्जमध्ये २० तास इयरबड्स वापरू शकता. Marshall Minor III ची किंमत खूपच कमी आहे. यामध्ये १२ एमएम डायनॅमिक ड्राइव्हर आणि कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ वी५.२ दिले आहे. इयरबड्स आउट-इयर फीट आहे व कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जमध्ये २५ तासांची बॅटरी लाइफ मिळते. दोन्ही इयरबड्समध्ये क्यूई वायरलेस चार्जिंग आणि टच कंट्रोल सपोर्ट मिळेल. Marshall Motif ANC हे अ‍ॅ सपोर्टसह येतात व यात ट्रांसपरेंट मोड दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3EFfm5I
via IFTTT