नवी दिल्ली : पेमेंट्स बँकेने शुक्रवारी रिवॉर्ड १२३ प्लस डिजिटल बचत खाते सुरू करण्याची घोषणा केली. हे डिजिटल बचत खाते युजर्सना ४९९ रुपयांच्या वार्षिक शुल्कावर उपलब्ध असेल, ज्यात ग्राहकांना कॅशबॅकसह अनेक फायदे मिळतील. Airtel पेमेंट्स बँकेच्या रिवॉर्ड १२३ प्लस डिजिटल बचत खात्यात युजर्सना १ वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सदस्यता देखील मिळेल. वाचा: मिळतील हे फायदे: Airtel च्या या नवीन डिजिटल बचत खात्यात ग्राहकांना अनेक फायदे मिळतील. त्यातील पहिला म्हणजे ,डिजिटल बचत खात्यात ग्राहकांना १ वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार मोबाईलची मोफत सदस्यता मिळेल. या सबस्क्रिप्शनची किंमत ४९९ रुपये आहे. युजर्स जेव्हा त्यांच्या वॉलेटमध्ये पैसे जोडणार तेव्हा त्यांना दरमहा १० रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळेल (किमान व्यवहाराची रक्कम १,००० रुपये असावी). याशिवाय, ग्राहकांना ३० रुपयांच्या फ्लॅट पेमेंटचा लाभ मिळेल. मोबाइल प्रीपेड रिचार्ज, मोबाईल पोस्टपेड, ब्रॉडबँड, लँडलाईन आणि डीटीएच बिल पेमेंटवर महिन्यातून एकदा युजर्सच्या खात्यात जमा होईल. यासाठी, किमान देय रक्कम २२५ रुपये असावी. Airtel पेमेंट्स बँकेच्या रिवॉर्ड १२३ प्लस डिजिटल बचत खात्यात, ग्राहकांना १ लाख ते २ लाख रुपयांच्या शिल्लक ६ टक्के व्याज, शून्य किमान शिल्लक आणि ऑटो स्वीप सुविधेसह अमर्यादित ठेवी मिळतील. एकदा ग्राहकाने रिवॉर्ड १२३ प्लस डिजिटल बचत खाते उघडले किंवा अपग्रेड केले की, ते त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकाचा वापर करून डिस्ने+ हॉटस्टार वेबसाइट किंवा अॅपद्वारे सदस्यता देखील सक्रिय करू शकतात. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39kWF8V
via IFTTT
0 Comments