नवी दिल्ली : वॉटर प्यूरीफायर बनवणारी लोकप्रिय कंपनी RO सिस्टम लिमिटेडने भारतीय बाजारात आपला नवीन वाय-फाय CamEye HomeCam 360 लाँच केला आहे. घराच्या सुरक्षेसाठी या कॅमेऱ्याला डिझाइन करण्यात आले आहे. हा कंपनीचा दुसरा सिक्योरिटी कॅमेरा आहे, जे मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे. याची किंमत ४,९९० रुपये असून, कॅमेरा इंस्टॉलेशन आणि एक वर्ष वॉरंटीसह येतो. सिक्योरिटी कॅमेऱ्याला अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. वाचा: हा क्लाउडवर व्हीडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करणारा बाजारातील उपलब्ध मोजक्याच कॅमेऱ्यापैकी एक आहे. म्हणजेच, कॅमेरा चोरीला गेला अथवा खराब झाला तरीही याचे रेकॉर्डिंग क्लाउड स्टोरेजवरून अॅक्सेस करता येईल. मध्ये एआय पॉवर्ड मोशन डिटेक्शन आणि ट्रॅकिंगसह ह्यूमन डिटेक्शन, ३६० डिग्री पॅनोरमिक व्हिजन पॅन व टिल्ट सारखे फीचर दिले आहे. अन्य फीचर्सबद्दल सांगायचे तर यात IR LED सह नाइट व्हिजन, २-वे कॉलिंगसोबत लाइव्ह व्हीडिओ स्ट्रीमिंग, क्लाउड रेकॉर्डिंग, प्रायव्हसी मोड, इव्हेंट बेस्ड रेकॉर्डिंग, ऑफलाइन मोड रेकॉर्डिंगचा समावेश आहे. चे खास फीचर्स 360° Panoramic Vision with Pan & Tilt हा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल एरियाचे मोठे क्षेत्र कव्हर करतो. कॅमेऱ्याला स्मार्टफोन अॅपचा उपयोग करून पॅन अथवा टिल्ट करता येतो व एफएचडी रिझॉल्यूशनमध्ये व्हीडिओ रेकॉर्ड करतो. AI motion detection & tracking: कॅमेरा तुमच्या घरातील कोणत्याही हालचालींची माहिती देतो व अॅपच्या माध्यमातून त्वरित स्मार्टफोनवर नॉटिफिकेशन पाठवतो. हे हालणाऱ्या वस्तूला देखील फॉलो करते व वेग रेकॉर्ड करू शकते. होम कॅमेऱ्यात एआय आधारित एडवांस्ड क्षमता आहे, जे ह्यूमन बॉडी ओळखण्यास सक्षम आहे. Night vision सिक्योरिटी कॅमेरा रात्री देखील घरावर लक्ष ठेवेल. यात एडवांस्ड आयआर सेंसर दिले आहे, जे आपोआप कमी प्रकाशात सक्रिय होते व प्रत्येक वेळी हाय-क्वालिटी व्हीडिओ रेकॉर्डिंग करते. Offline Mode Recording कॅमेऱ्याला सेटिंग-अपसाठी केवळ इंटरनेटची गरज पडते. इंटरनेट नसल्यावर मायक्रोएसडी कार्डमध्ये रेकॉर्डिंग सेव्ह करते व इंटरनेट कनेक्टिव्हिटी असताना रेकॉर्डिंग क्लाउडवर पाठवून सेव्ह करते. यात १२८ जीबीपर्यंतचे मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट करते. मायक्रोएसडी कार्डवर ६० दिवसांपर्यंत व्हीडिओ स्टोर करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hGwI87
via IFTTT
0 Comments